Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिष्यवृत्ती परीक्षेत रा. भा. शिर्के प्रशालेचे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

शिष्यवृत्ती परीक्षेत रा. भा. शिर्के प्रशालेचे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

त्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेच्या १३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.

इयत्ता पाचवीच्या परीक्षेत ६६ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये आर्या विशाल मोरे (गुणवत्ता यादी क्र. ८), दूर्वा संतोष शिंदे (१७), अनुज मनोज कांबळे (७२), रोहन अमर घोसाळकर (७५), नियती विपिन सावंत (१११) यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ. टी. जे. यादव, एस. वाय. कुवर, वाय. एस. महाले, ए. आर. आखाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता आठवीमध्ये ५७ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये वेदी उमेश बंदरकर (१९), अर्णव मंगेश पानगले (२१), दिया प्रशांत परब (५१), चिन्मय प्रकाश रावणंग (५५), उर्वी समीर गोताड (५७), मुग्धा राजेंद्र यादव (५८), साई सतीश नेवरेकर (६९), आर्य गुरुप्रसाद जोशी (९५) यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख सौ. एस. डी. साखळकर, सौ. एस. के. कांबळे, सौ. ए. एन. अभ्यंकर, एस. एस. पांढरे, पी. सी. जाधव व सौ. पी. एम. पवार यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था पदाधिकारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital