Dailyhunt
शिवसेनेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क पदी निवड झाल्याबद्दल आमदार किरण सामंत यांचे जंगी स्वागत

शिवसेनेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क पदी निवड झाल्याबद्दल आमदार किरण सामंत यांचे जंगी स्वागत

लांजा (प्रतिनिधी) :शिवसेनेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क पदी निवड झाल्याबद्दल लांजा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आमदार किरण सामंत यांचे लांजा जंगी स्वागत करण्यात आले.
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार किरण सामंत यांच्यावर शिवसेना पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क पदाची जबाबदारी सोपवली आहे.‌ त्यानंतर लांजा दौऱ्यावर आलेल्या आमदार किरण सामंत यांचे लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने लांजा येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

जा येथील आमदार निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, गणेश लाखण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, माजी नगरसेवक लल्या कुरूप, राहुल शिंदे, अशोक गुरव, हेमंत शेट्ये, नागेश कुरूप, राजू जाधव आदींसह अन्याय शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital