Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रीक्षेत्र गणपतीपुळे जागृत देवस्थान; दर्शन घ्यायला नक्की येईन

श्रीक्षेत्र गणपतीपुळे जागृत देवस्थान; दर्शन घ्यायला नक्की येईन

त्नागिरी : पुण्याच्या दौऱ्यावर आलेले भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची श्री देव श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत वि. घनवटकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांच्याशी विविध सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. यावेळी अभिजीत घनवटकर यांनी श्री. शाह यांना श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्री दर्शनाला येण्याचे आमंत्रण दिले. त्याचा तत्काळ स्वीकार करत श्री. शाह म्हणाले श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागृत देवस्थान आहे, दर्शन घेण्यासाठी मी नक्की येईन.

या सकारात्मक भेटी बद्दल बोलताना श्री अभिजीत विनायक घनवटकर यांनी गृहमंत्र्याना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यशस्वी नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचे अखंड बळ लाभो अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना सुद्धा केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital