Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत; उपाध्यक्षपदी विनोद मर्गज बिनविरोध.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत; उपाध्यक्षपदी विनोद मर्गज बिनविरोध.

सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी आधुनिक शिक्षण-प्रशिक्षणावर भर;

नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सिंधुनगरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवी दिशा देण्याच्या निर्धारासह सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली.

गुरुवारी सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील मंडळाच्या कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत गजानन संभाजी सावंत यांची अध्यक्षपदी, तर विनोद रामचंद्र मर्गज यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्यकारिणीची ही बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. दळवी यांनी दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत आणि उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनी मनोगतात सहकार क्षेत्राला काळानुरूप सक्षम करण्यासाठी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक सहकारी शिक्षण व प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक वातावरणात सहकारी संस्था अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि लोकाभिमुख करण्यासाठी मंडळ प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन संचालक मंडळात विलासराव बा. ऐनापुरे, गजानन सु. गावडे, मधुसुदन के. गावडे, सुभाष रा. तळवडेकर, केशव र. नारकर, प्रकाश मु. सावंत, सुरेश ज्ञा. चौकेकर तसेच संचालिका कुंदा पै आणि प्रज्ञा प्र. परब यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश रा. पांचाळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital