Dailyhunt
स्वामी नामाचा प्रसार आणि विनम्र सेवा हेच श्रेष्ठ कार्य!

स्वामी नामाचा प्रसार आणि विनम्र सेवा हेच श्रेष्ठ कार्य!

​खोटले स्वामी मठात रंगला सेवेकऱ्यांचा सन्मान सोहळा.

मसुरे | झुंजार पेडणेकर : मठामध्ये दर्शनार्थ आलेल्या स्वामी भक्तामध्ये स्वामी महाराज यांना पाहून सेवा करा. आपली सेवा आपल्या आयुष्य सोबत संपू नये, ती अखंडीत चालावी म्हणून नवनवीन मुले, तरुण यांना संस्कारक्षम सेवेकरी बनवा.निदान आठवड्यातून एकदा तरी स्वामी मठात येऊन सामुदायिक नामस्मरण,उपासना करा.

सामुदायिक नामस्मरणाचा पुण्य संचय फार महत्वाचा असतो असे प्रतिपादन स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ मुंबई- विलेपार्ले येथील मठाधीश श्री विजय नलावडे यांनी खोटले येथे केले.

श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे श्री विजय नलावडे यांच्या उपस्थितीत उत्सव समिती सदस्य आणि सेवेकरी यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथील स्वामी समर्थ महाराज यांचा आत्मलिंग पादुका मठाला 150 वर्षाची परंपरा आहे. त्या मुळे तिथे स्वामी भक्तांची सतत ये जा असते, आणि सेवेकरी यांना कित्येक वर्षांचा अनुभव असल्याने सेवा करणे सुलभ आहे. परंतु अलीकडेच 22 वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या खोटले येथील या श्रद्धास्थानचे महत्व, स्वामी नामाचा प्रसार समाजा मध्ये पोहचविणे, आणि आलेल्या भाविकांची विनम्र सेवा करणे हि सोपी गोष्ट नाही. परंतु आपण सर्वांनी स्वामी कृपेनें आणि तुमच्या प्रबळ इच्छा शक्तीने फार उत्तम सेवा करत आहात. केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक कार्य आपण करत आहात या बद्दल तुमचे कौतुकच आहे असे ते म्हणाले. या वर्षी प्रथमच 21विद्यार्थी सेवेकरी यांनी स्वामी सेवा आनंदाने केली. या बद्दल नलावडे दादा यांनी या उमलत्या सेवेकरांचे अभिनंदन केले. शिक्षण घेत असतेवेळी योग्य वेळी चांगले विनम्र सेवेचे संस्कार आपल्यावर घडत आहेत हि उज्वल सन्मार्गाची नांदी आहे. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ विधीज्ञ शैलेश जाधव, मठाधीश गणेश घाडीगावकर, खजिनदार विठ्ठल परब, दत्ताराम राणे, केशव सावंत तसेच स्वामी भक्त उपस्थित होते. आभार गणेश घाडीगावकर यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital