घाटी गटात कोसुंब येथील साहिल बने प्रथम श्री सुकाई देवी देवस्थान तळवली यांचे आयोजन
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने पार पडलेल्या सामूहिक गावठी व घाटी बैल नांगरणी स्पर्धेत गावठी गटात
आई लिंगूबाई पाथर्डी/तीर्थक मकरंद बागकर तळवली यांनी पुन्हा एकदा आपली छाप सोडत प्रथम क्रमांक पटकावला.तर घाटी गटात संगमेश्वर कोसुंब येथील साहिल बने यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
तळवली ग्रामदेवता मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सामूहिक नांगरणी स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा थरार चांगलाच रंगला.यावर्षी प्रथमच घाटी गट देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते.दोन गटात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत गावठी गटात चिखली येथील निलेश गमरे द्वितीय, तुरळ येथील भैरी भवानी केदार तृतीय क्रमांक पटकावला.तर घाटी गटात अवधूत सकपाळ व सचिन मराठे यांचा शृंगारतळीचा राजा द्वितीय, कोसुंब येथील समीर बने यांनी तृतीय, खेर्डी येथील स्वामी समर्थ रामदाते यांनी चतुर्थ, तळवली येथील अभिषेक सांगळे यांनी पंचम, तर आरवली येथील केदारनाथ
निर्वि यांनी सहावा क्रमांक पटकावला. दोन्ही गटातील विजेत्यांना आयोजकांच्यावतीने रोख रक्कम व मनाची ढाल देऊन गौरविण्यात आले.
तर गावातील दोन बैलजोडीस देखील यावेळी बक्षीस देऊन गौरविण्यात आले.यामध्ये अभिषेक सांगळे प्रथम वप्रणय आरोलकर व वैभव शितप द्वितीय यांना गौरविण्यात आले.स्पर्धेचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तळवली ग्रामदेवता कमिटी व ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.

