Dailyhunt
​तळवणे शाळेची विद्यार्थिनी अंतरा मठकर हिची जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत बाजी

​तळवणे शाळेची विद्यार्थिनी अंतरा मठकर हिची जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत बाजी

भारतीय जनता पक्षाच्यावतीने विशेष सत्कार​सावंतवाडी । प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नंबर २ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी अंतरा बापू मठकर हिने मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

​अंतरा मठकर हिने क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे तळवणे गावाच्या आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. नेहा नारायण कांबळी यांच्या हस्ते अंतराचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात घेतलेली ही झेप कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना सांगण्यात आले.

​या सत्कार समारंभाप्रसंगी तळवणे गावचे सरपंच श्री. गोविंद केरकर, बांदा मंडळ सरचिटणीस श्री. नारायण कांबळी, ग्रामपंचायत सदस्य श्री. सावळाराम घाटये, ग्रामपंचायत सदस्य श्री. सिद्धेश कांबळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी सैनिक श्री. रामदास कांबळी, वायरमन श्री. दिलीप गावडे, बूथ अध्यक्ष श्री. गणपत सातार्डेकर, ग्रामस्थ श्री. नकुल कांबळी, श्री. शशिकांत कांबळी, श्री. भरत कांबळी, श्री. उल्हास कांबळी यांनीही उपस्थित राहून अंतराचे कौतुक केले.
​या कार्यक्रमाला महिला वर्गाची देखील मोठी उपस्थिती लाभली होती. यामध्ये सौ. शर्मिला कांबळी, सौ. रेश्मा कांबळी, सौ. भावना कांबळी, सौ. नित्या कांबळी, सौ. वैशाली कांबळी, सौ. योगिता कांबळी, सौ. गजश्री कांबळी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतराच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital