Dailyhunt
तुळस परिसरात गवा रेड्यांचा कळप फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तुळस परिसरात गवा रेड्यांचा कळप फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वेंगुर्ले : दाजी नाईक आज गुरुवारी सकाळी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील शिवाजी हायस्कूल, माळकरवाडी परिसरात गवा रेड्यांचा कळप फिरत असल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तरी वनविभागाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सद्या तुळस परिसरात गवा रेड्यांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या गवारेडे गावात सैरावैरा धावताना दिसत आहेत. दहा दिवसांपूर्वी याच भागात गवा रेड्यांची झुंज लागून त्यांनी दोन गाड्यांना धक्का दिला होता. या अपघातात चार जण जखमी झाले होते.

त्यामुळे या गवारेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी वाढत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital