कालबाह्य होत असलेल्या नाचणी शेतीला दिली नवसंजीवनीगुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील उमराठ गावाने हरित क्रांती घडवून आणली आहे. येथील असाध्य शेतकरी गटातर्फे १० एकर जागेवर नाचणी शेतीची लावणी सामूहिक पद्धतीने करून जिल्ह्यात एक नवा आदर्श ठेवला आहे.
सामुहिक भातशेती अनेक बचत गटांकडून केली जाते. सामुहिक नाचणी शेतीची लागवड फारसी कोणी करत नाही. परंतू मोठ्या प्रमाणात दुर्लक्षीत होत चाललेली नाचणीची शेती करून मधूमेहींना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या असाध्य शेतकरी गटातर्फे केला जात आहे हे एक प्रमुख वैशिष्टय़े आहे.
या असाध्य शेतकरी गटाला पंचायत समिती गुहागर कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून ग्रामपंचायत उमराठनेसुद्धा उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे.

