Dailyhunt
उमरोली अरमरे वाडी येथे २१ पासून श्री साई सेवा मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास प्रारंभ

उमरोली अरमरे वाडी येथे २१ पासून श्री साई सेवा मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास प्रारंभ

चिपळूण (वार्ताहर): तालुक्यातील श्री साई सेवा मंडळ उमरोली अरमरेवाडी यांच्या वतीने मंगळवार दिनांक २१ ते २४ एप्रिल दरम्यान श्री साई मंदिर जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री साई सेवा मंडळाच्या वतीने मंगळवार २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता श्रींच्या मूर्तीचे भव्य मिरवणूक होणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता महाप्रसाद होईल.
बुधवार २२ रोजी सकाळी ८ वाजता वास्तु प्रवेश व वास्तुशांती, सकाळी ११.३० वाजता देवता प्रवेश, सकाळी ११.३० ते १२ वाजता जलाधीवास, दुपारी १२ ते १२.३० वाजता धान्यधीवास, दुपारी १२.३० वाजता निद्राधीवास, दुपारी १ ते २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता साई सेवा भजन मंडळ मुंबई यांचा कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७.३० ते ९.३० ह भ प अनंत मोरे यांचे कीर्तन आणि रात्री १.३० वाजता श्री भैरी भवानी भारुड मंडळ यांचा बहुरंगी कार्यक्रम होईल.

त्यानंतर गुरुवार दिनांक २३ रोजी सकाळी ८.३० ते ११.३० वाजता होम हवन, दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, दुपारी १२.३० वाजता कलशारोहण, दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, रात्री ७.३० ते ९.३० वाजता ह भ प नारायण पवार अनारी यांचे कीर्तन, रात्री १०.३० वाजता श्री साई सेवा महिला मंडळ संकल्पित गर्जा महाराष्ट्र माझा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

मंडळाच्या वतीने शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी १० वाजता शैक्षणिक ,सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रम, सकाळी ११ ते १ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७.३० ते ९ वाजता श्री साई सेवा भजन मंडळ वेळवंड रत्नागिरी यांचा कार्यक्रम होईल. रात्री ९ ते १० वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता स्वागत समारंभ आणि रात्री १०.३० वाजता श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी यांचा बहुरंगी कार्यक्रम होईल. साई सेवा मंडळ उमरोली अरमरेवाडी यांच्या वतीने चार दिवसाचा हा साई सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी साई भक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital