Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

दोन महसूल कर्मचारीही सन्मानित

वैभववाडी l प्रतिनिधी : महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, महसूल सहाय्यक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

महसूल दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि दोन महसूल कर्मचाऱ्यांची निवड झाली. शनिवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

महसूल सहाय्यक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांनी कार्यालयीन कामकाजात दाखविलेली तत्परता, प्रामाणिक सेवा आणि उल्लेखनीय योगदान याचीही दखल घेण्यात आली. या सन्मानाबद्दल तालुक्यात सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital