ताबडतोब उचलण्यात यावे, नाहीतर गणपती विसर्जनला अडथळा निर्माण होईल- शौकत मुकादमचिपळूण (प्रतिनिधी) : बहादुरशेख कळंबस्ते येथील दोन जुने वाशिष्ठी पूल तोडण्यात आले, त्या तोडल्याचे पुलाचे मटेरियल नदीपात्रातच टाकून ठेवण्यात आले आहेत.
एकीकडे पुराचे पाणी भरू नये म्हणून गाळ काढले जात आहे, परंतु तोडलेल्या पुलाचे मटेरियल नदीपात्रातच आहे. कळंबस्ते वाशिष्टी पुलाजवळ गणपती विसर्जन केले जातात. या नदीपात्रामध्ये खराब मटेरियल टाकून ठेवल्यामुळे गणपती विसर्जन करतेवेळी तेथे अडथळा निर्माण होत आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी अजूनदेखील पाण्यातील मटेरियल उचलण्यात आलेले नाही. ते ताबडतोब उचलण्यात यावे, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
कापसाळ येथे लघुपाटबंधारे कार्यालय यांनी सदरच्या नदीपात्राच्या पाण्यामध्ये जुन्या पुलाचे जे मटेरियल टाकून ठेवण्यात आले आहे ते ताबडतोब उचलण्यात यावे असे लेखी पत्र मुंबई गोवा हायवेच्या अधिकाऱ्यांना एक वर्षांपूर्वी दिले आहे. ठेकेदारांनी काम अर्धवट ठेवले आहे, ते पूर्ण करून नदीपत्रातील मटेरियल उचलण्याची सूचना द्यावी असे कळविले होते, तरी देखील जुना पुलाचे टाकलेले मटेरियल अद्याप उचलण्यात आलेले नाही, त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. तरी पावसाळ्यापूर्वी असलेले मटेरियल ताबडतोब उचलण्यात यावे, नाहीतर यंदाच्या गणपती विसर्जनसाठी अडथळा निर्माण होईल, असेही शौकत मुकादम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे.

