वेंगुर्ले : प्रतिनिधी
बँक पातळीवरील वसुलपात्र कर्जाची १०० टक्के परतफेड (कर्जवसुली) केलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील विकास संस्थांच्या व्यवस्थापकीय कमिटी सदस्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री.
मनिष दळवी व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवार ११ ऑगस्ट रोजी सायं ५.०० वाजता साई डिलक्स हॉल, सुंदरसाटले वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सदर कार्यक्रमास वेंगुर्ला तालुक्यातील सर्व विकास संस्था व्यवस्थापक कमिटी सदस्य व सचिव यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

