Dailyhunt
विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलचे यश

विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलचे यश

त्नागिरी: विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत येथील मिस्त्री हायस्कूलच्या मुलांचा संघ विजयी ठरला तर, मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावत दबदबा राखला.
मेस्त्री हायस्कुलच्या मैदानावर विभागीय स्पर्धा झाली.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात जिद्द, चिकाटी आणि उत्तम खेळ केला. त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक मुश्ताक आगा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मुन्नावर तांबोळी, संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून भविष्यातही विद्यार्थी अशाच प्रकारे उत्तमोत्तम कामगिरी करतील, असा विश्वास श्री. आगा यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital