विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) विठ्ठलवाडी मित्रमंडळ, विजयदुर्ग यांच्या सार्वजनिक माघी गणेशोत्सव २०२६ निमित्त गेल्या दोन वर्षांपासून विघ्नहर्ता ग्रुप विजयदुर्गचे सर्वेसर्वा शंकर सागवेकर यांच्या वतीने विजयदुर्ग, रामेश्वर व गिर्ये येथील मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून विघ्नहर्ता ग्रुप विजयदुर्गच्या वतीने रोख शिष्यवृत्ती देण्यात येते.
यावर्षीच्या शिष्यवृत्तीचे वितरण नुकतेच करण्यात आले. यामध्ये श्रावणी नरसाळे, सृष्टी आदम, वैष्णवी डोंगरे, मयुरेश मोंडकर आणि स्वरा बाबले या स्पर्धकांना रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख शितल देवरकर, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, विघ्नहर्ता ग्रुप विजयदुर्गचे शैलेंद्र मणचेकर, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे सदस्य विनोद सावंत, प्रथमेश सावंत उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

