Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विक्रांत सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

विक्रांत सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजगाव विभागाचे सदस्य तथा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमांना मतदारसंघातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या निमित्ताने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

वाढदिवसाच्या औचित्याने बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर या ठिकाणी भव्य 'महिला दशावतार' नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती लाभली.

वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. माजगाव येथे 'लॉरेन्स अँड मेयो' यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ विक्रांत सावंत यांच्या हस्ते झाला. या शिबिरात परिसरातील २५ गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कपाट व अन्य उपयुक्त वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. याशिवाय, सरमळे येथील रमाई नगर येथे चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळच्या सत्रात वेत्ये आणि सोनुर्ली गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व उपक्रमांच्या वेळी व शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, काका मांजरेकर, अशोक दळवी, विजय गावडे, संजय कानसे, मृणाली कशाळीकर, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूलचे प्राध्यापक व कर्मचारी, तसेच माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital