Monday, 10 Aug, 11.40 pm प्रहार कोकण

होम
77 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू; 2299 एकूण कोरोना रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी

कालपासून जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर येथून 04, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा 10 अशा 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 52 होम आयसोलेशन मध्ये असलेले आणि 05 परजिल्ह्यात उपचारासाठी गेलेले रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1568 झाली आहे.

पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
रत्नागिरी - 22
दापोली-04
कळंबणी-16
गुहागर-03
कामथे-02
देवरुख-03
रायपाटण-05
अँटीजेन-22

आज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खेडशी ता. रत्नागिरी येथील एका 55 वर्ष वयाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या रुग्णाचा मृत्यु झाला. तसेच वांद्री ता. संगमेश्वर येथील 57 वर्षीय रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 80 झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह - 2290
बरे झालेले - 1568
मृत्यू - 80
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह - 642

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 642 आहे. आज मौजे सौभाग्य नगर नाचणे, मौजे रविंद्र नगर कुवारबाव, शिवशक्ती अर्पाटमेंट टी.आर.पी.नाचणे, मौजे ब्राम्हणवाडी गावखडी, मौजे घाणेकर वाडी, अभ्युदयनगर खेडेकर चाळ, स्वप्नलोक अर्पाटमेंट एस.टी.स्टँड समोर, सावंत प्लाझा बोर्डिंग रोड, गोगटे कॉलेज महिला वसतिगृह हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 243 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 47 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये, खेड मध्ये 69 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 4, चिपळूण तालुक्यात 100 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 4, संगमेश्वर तालुक्यात 2, गुहागर तालुक्यात 7 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी - 41, समाजकल्याण, रत्नागिरी - 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 50, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -21, कोव्हीड केअर सेंटर घरडा - 4, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे - 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली - 20, गुहागर - 1, पाचल -1असे एकूण 151 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 47 हजार 550 इतकी आहे.

17 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 20 हजार 309 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 741 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2290 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 17 हजार 440 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 568 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 568 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 09 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 63 हजार 567 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 15 हजार 580 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top