Wednesday, 27 Jan, 6.40 pm प्रहार कोकण

रत्नागिरी
भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे गुरुवारी राजापूरात

शेतकरी आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबीराचे राणे यांच्या हस्ते शुभारंभ

राजापूर|प्रतिनिधी
राजापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत तालुका भाजपाच्या वतीने गुरूवार २८ जानेवारी रोजी शेतकरी आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबीराचे आयोजिण करण्यात आले आहे. या शिबीराचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
राजापूर हायस्कूल कलामंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता या शिबीराचा शुभारंभ होणार असून याप्रसंग प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅ ड. दीपक पटवर्धन उपस्थित रहाणार आहेत.
या शेतकरी आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबीराला डॉ. प्रसाद देवधर, डॉ. प्रकाश साळुंके, श्री. बी. आर. पाटील, श्री. अनिल पेडणेकर, श्री. राजेश कांदळगावकर व श्री. मोहन होडावडेकर आदी मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, ऊस लागवड, व्यवसाय व बांबू लागवड या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या शेतकरी आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबीराला सर्व शेतकरी, भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी केले आहे.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top