Tuesday, 04 Aug, 6.40 pm प्रहार कोकण

होम
दिलीप बिल्डकॉन कंपनीचा बेजबाबदारपणा,६ फुटाचा पत्रा पडला कारवर

ठेकेदार कंपनी विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल

कणकवली | प्रतिनिधी :
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्‍या दिलीप बिल्डकॉन कंपनीचा बेजबाबदारपणा आज पुन्हा एकदा समोर आला. उड्डाणपूल उभारणीसाठी लावलेला सहा फुटाचा साईड प्लेट पत्रा आज चालत्या कारवर आदळला. सुदैवाने पत्रा कोसळत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखले, त्यामुळे अपघात टळला. या घटनेनंतर कारचालकाने येथील पोलिस ठाण्यात दिलीप बिल्डकॉन विरोधात तक्रार दाखल केली.

शहरात उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व्हिस रोड लगत फुटाचे पत्रे लावून आत पुलाच्या स्लॅबसाठी सपोर्ट उभारण्यात आले आहेत. यातील एक पत्रा आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक महामार्गावर कोसळला. त्यावेळी दिगंबर शांताराम भोसले आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर घेऊन जात होते. पत्रा कोसळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडीचा वेग वाढवला. या दरम्यानJ मागील कारच्या मागील भागावर हा पत्रा आदळला. काही क्षण आधी हा पत्रा कोसळला असता तर मोठा अपघात होण्याचीही शक्यता होती.

दरम्यान महामार्ग चौपदरीकरण कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या या बेजबाबदारपणा विरोधात कारचालक दिगंबर भोसले यांनी अ‍ॅड.स्वप्नील सावंत यांच्यासह कणकवली पोलीस स्थानकात येऊन ठेकेदारा विरोधात तक्रार दिली. तर कणकवली पोलिसांनी हायवे ठेकेदाराविरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 427 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top