ठेकेदार कंपनी विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल
कणकवली | प्रतिनिधी :
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचा बेजबाबदारपणा आज पुन्हा एकदा समोर आला. उड्डाणपूल उभारणीसाठी लावलेला सहा फुटाचा साईड प्लेट पत्रा आज चालत्या कारवर आदळला. सुदैवाने पत्रा कोसळत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखले, त्यामुळे अपघात टळला. या घटनेनंतर कारचालकाने येथील पोलिस ठाण्यात दिलीप बिल्डकॉन विरोधात तक्रार दाखल केली.
शहरात उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व्हिस रोड लगत फुटाचे पत्रे लावून आत पुलाच्या स्लॅबसाठी सपोर्ट उभारण्यात आले आहेत.
दरम्यान महामार्ग चौपदरीकरण कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या या बेजबाबदारपणा विरोधात कारचालक दिगंबर भोसले यांनी अॅड.स्वप्नील सावंत यांच्यासह कणकवली पोलीस स्थानकात येऊन ठेकेदारा विरोधात तक्रार दिली. तर कणकवली पोलिसांनी हायवे ठेकेदाराविरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 427 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
