Tuesday, 04 Aug, 8.41 pm प्रहार कोकण

होम
एस.टी. कर्मचा-यांना दोन महिन्याचे वेतन मिळणार; शासनाने ५५० कोटी रूपये केले मंजूर

चिपळूण । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांचे वेतनसाठी रक्कम महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने देय असलेल्या तारखेस मार्च २५% , मे ५० % , जून महिन्याचे वेळेत वेतन झालेले नाही यासंदर्भात सातत्याने एसटी कर्मचा-यांचे पगार देण्यासंदर्भात शासनाने इतर राज्याप्रमाणे अर्थसहाय्य द्यावे याकरिता महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे तसेच यासंदर्भात व्यक्तिगतरित्या परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांनी शासन स्तरावर प्रयत्न केलेत व एसटी प्रशासनाने सुध्दा पाठपुरावा केलेला आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत कोणत्याही संघटनेला बोलविण्यात आलेले नाही आणि कोणत्याही संघटनांबरोबर चर्चा झालेली नाही व कोणत्याही संघटनेचा बैठकीत सहभाग नव्हता त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही व कोणी श्रेय घेऊ शकत नाही. याशिवाय एवढ्यावरच एसटी कर्मचा-यांचा संघर्ष संपलेला नाही कारण पुन्हा राहिलेल्या वेतनासाठी लढावेच लागणार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी व्यक्त केली आहे.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटीला आर्थिक मदत व कर्मचा-यांच्या वेतनासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली. सदर बैठकीत एसटी महामंडळास ५५० कोटी रूपये अर्थसहाय्य मंजूर केले. लवकरच ५५० कोटी रूपये एसटी महामंडळाच्या खात्यात जमा होतील त्यामुळे कर्मचा-यांच्या दोन महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कर्मचा-यांना दोन महिन्याचे वेतन लवकरच मिळेल त्यामध्ये मार्च २५% , मे ५० % व जून महिन्याचे वेतन मिळण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top