Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कणकवलीत विना मास्क फिरणाऱ्या ८५ जणांवर दंडात्मक कारवाई

कणकवलीत विना मास्क फिरणाऱ्या ८५ जणांवर दंडात्मक कारवाई

तीन दिवसात केला ८५ जणांवर केला १७ हजाराचा दंड
नगरपंचायत व पोलीस यांची संयुक्त कारवाई

संतोष राऊळ(कणकवली )
कणकवली नगरपंचायत आणि कणकवली पोलीस प्रशासन यांच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.गेल्या तीन दिवसात ८५ जणांवर दंडात्मक कारवाई केली.यात १७ हजार रुपयांचा दंड ठोकण्यात आला.
कणकवलीत गेले तिनदीवस विनामस्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू आहे.यात पहिल्या दिवशी २६ जनावर तर दुसऱ्या दिवशी २७ जनावर कारवाई करण्यात आली होती.आज तिसऱ्या दिवशी ३२ जनावर कारवाई केली असे एकूण ८५ जणांवर कारवाई केली.
कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी कणकवलीत प्रथम जनता कर्फ्यु यशस्वी करण्यात आला होता.आता विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून कोरोना रोखण्यासाठी सर्वच प्रकारची काळजी घेतली जात आहे.ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस हवालदार विश्वजित परब,चंद्रकांत माने,श्री.पिंटो,संदेश आंबिटकर यांच्या सह नगरपंचायतचे कर्मचारी सतीश कांबळे,प्रवीण गायकवाड, विजय राणे यांनी काम पाहिले आहे.

ही मोहीम कायम सुरू राहणार असून प्रत्येकाने मास्क लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहन कणकवली नगरपंचायत ने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital