Friday, 07 May, 6.40 pm प्रहार कोकण

होम
लसीकरणाचे योग्य नियोजन करा ; कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली

जिल्हाधिका-र्यांना दिले निवेदन

कुडाळ | प्रतिनिधी:

सिंधुदुर्ग जिल्हात उपलब्ध होणारे डोस जिल्हातील नागरिकानांच प्राधान्याने उपलब्ध होण्यासाठी कोव्हीन पोर्टलच्या आज्ञावलीत योग्य ते बदल करावेत अशा रीतीने जिल्ह्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन व्हावे अशी मागणी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनातुन केली.

या निवेदनात नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी नमुद केले की, दि. 1 मे 2021 पासून राज्यभरात 18 ते 44 वयोगटोतील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरण करून घेणेसाठी कोव्हीन पोर्टलच्या वर नोंदणी करून आगाऊ वेळ निश्चित करणे बंधणकारक आहे. अशा रीतीने वेळ आरक्षित करते वेळी पोर्टलच्या वर पिन कोट प्रविष्ट केल्यानंतर नजीकची लसीकरण केंद्रे व तिथे उपलब्ध असणारे डोस यांची माहिती येते व आपल्या सोयीनुसार वेळ आरक्षित करता येते.

परंतु, गेल्या काही दिवसांत या सुविधेमूळे बाहेरील जिल्हातील नागरिकांनी सिंधुदुर्ग जिल्हात लस घेतल्याचे निदर्शनास आले आहे. मुळातच लसीच्या डोसांचे वितरण लोकसंख्येच्या प्रमाणात होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी डोस उपलब्ध होतात. त्यामुळे अश्याप्रकारे बाहेरील जिल्हातील नागरिकांनी सिंधुदुर्ग जिल्हात लस घेतल्यास येथील स्थानिक नागरिकांना लसीपासून वंचित रहायला लागू शकते असे नमुद केले आहे.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top