Friday, 11 Jun, 1.40 pm प्रहार कोकण

रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जुई, अर्णव, अन्वय, मुकुल, मानसी प्रथम तर चित्रकला स्पर्धेत सानवी, गौरी, ऋषभ, रोहित, विलास प्रथम

जालगांव | वार्ताहर :

जागतिक सायकल दिनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेत १२००+ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. लॉकडाउन काळात पालक व मुलांच्या विरंगुळ्यासाठी आणि जनजागृतीसाठी सायकल विषयावर ही स्पर्धा विनामूल्य आयोजित करण्यात आली होती. निबंध आणि चित्रकला स्पर्धेसाठी पहिला गट वय ८ पेक्षा कमी, दुसरा गट वय ८+ ते १२, तिसरा गट वय १२+ ते १६, चौथा गट वय १६+ ते २५, पाचवा खुला गट वय २५ पेक्षा अधिक असे वयोगटानुसार प्रत्येकी ५ गट होते. प्रत्येक गटातून तीन विजेते निवडण्यात आले.

निबंध स्पर्धेच्या पहिल्या गटात १. जुई सचिन गद्रे, मुरुड दापोली, २. आज्ञा प्रकाश इंदवटकर, लांजा, ३. ओम मिलिंद शिवलकर, आरे रत्नागिरी. दुसऱ्या गटात १. अर्णव रुपेश कोतेरे, जालगाव दापोली, २. स्वरा दुर्वेश साळुंखे, झाडगाव रत्नागिरी, ३. अंशुल विक्रांत पाटील, कुडावळे दापोली. तिसऱ्या गटात १. अन्वय सचिन देसाई, कुवारबाव रत्नागिरी, २. हर्षदा नारायण चव्हाण, आंजणारी लांजा, ३. निपुण सचिन लांजेकर, रत्नागिरी. चौथ्या गटात १. मुकुल संजय सोमण, चिपळूण, २. शुभम सिताराम भोवड, देवीहसोळ राजापूर, ३. दिपेश दिनेश लखमदे, दापोली. पाचव्या गटात १. मानसी प्रसाद गानू, रत्नागिरी, २. श्रीया शिरीष घाणेकर, जालगाव दापोली, ३. विनायक पांडुरंग कुडकर, वेरळ खेड हे विजेते ठरले.

चित्रकला स्पर्धेच्या पहिल्या गटात १. सानवी शशांक भिंगार्डे, साडवली संगमेश्वर, २. नीरजा मनोज वेदक, चंद्रनगर दापोली, ३. प्रार्थना रामप्रसाद कीर, टेंभ्ये रत्नागिरी. दुसऱ्या गटात १. गौरी भगवान जांभळे, कसाल चिपळूण, २. मानसी मंदार जुवेकर. कोळबांद्रे दापोली, ३. आभा हृषीकेश भाटवडेकर, रत्नागिरी. तिसऱ्या गटात १. ऋषभ हर्षद कोतवडेकर, नाचणे रत्नागिरी, २. श्रीईशा महेश करंदीकर, जालगाव दापोली, ३. पलक राहुल दळी, खेंड चिपळूण. चौथ्या गटात १. रोहित राजू कोकरे, देवरुख, २. पूजा रामचंद्र नारकर, नाचणे रत्नागिरी, ३. विश्वनाथ प्रकाश कळंबटे, हातखंबा रत्नागिरी. पाचव्या खुल्या गटात १. विलास विजय रहाटे, देवरुख, २. कमल दिलीप नितोरे, कोळंबे रत्नागिरी, ३. प्रशांत पांडुरंग डिके, कुंभवे दापोली हे विजेते ठरले.

याव्यतिरिक्त १. मानसी मंगेश काष्टे, इनाम पांगारी दापोली, २. आर्या विलास ओक, पालशेत गुहागर, ३. पायल राजेश तांबे, अस्तान खेड, ४. एकनाथ रमेश नाचरे, किल्लावाडी बाणकोट मंडणगड, ५. सारिका दत्तात्रय बिवलकर, कोळथरे दापोली, ६. सलोनी संजय तांबे, कोन्हवळी, देव्हारे मंडणगड या स्पर्धकांना उल्लेखनीय बक्षीस देण्यात येईल. या सर्व विजेत्यांचे कौतुक होत आहे. सर्व विजेत्यांना बक्षीस व ट्रॉफी पोस्टाने घरपोच मिळेल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना इ प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोनिका साबडे, मोहिनी पाटील, अंबरीश गुरव, निलीमा देशमुख, श्रीराम महाजन, विद्याधर ताम्हणकर, संजय दळवी, सुनील रिसबूड, डॉ अमृता होन, मिलिंद खानविलकर इत्यादी अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.

याबद्दल अधिक माहिती देताना दापोली सायकलिंग क्लबचे संस्थापक अध्यक्ष अंबरीश गुरव यांनी सांगितले की, क्लबतर्फे पहिल्यांदाच अशी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी स्पर्धकांनी लिहिलेले निबंध आणि चित्रे एकापेक्षा एक अशी सरस होती, त्यामुळे परीक्षक टीमला खूपच मेहनत घ्यावी लागली. काही मर्यादेमुळे प्रत्येक गटातून फक्त तीन स्पर्धक निवडण्यात आले. त्यामुळे इतरांनी नाराज न होता असेच सर्व स्पर्धां परीक्षांमध्ये सहभागी होत स्वतःला अधिक सक्षम बनवायचे आहे. दरवर्षी ३ जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराचा व्यायाम होतो, आरोग्य तंदुरुस्त राहते.

मानसिक ताणतणाव दूर होतो. इंधनाची बचत होते, त्यामुळे आपले पैसे वाचतात. वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होत नसल्याने पर्यावरण जपले जाते. सायकलसाठी कमी जागा लागत असल्याने गर्दीच्या ठिकाणी, बाजारात पार्किंगच्या अडचणी येत नाहीत. सायकलमुळे खर्या अर्थाने निसर्गाशी जोडले जातो, आजूबाजूचे जग, निसर्ग अजून चांगल्या रीतीने अनुभवता येते. त्यामुळे सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा. सायकल संस्कृती अधिक रुजावी म्हणून दापोली सायकलिंग क्लब तर्फे अनेक सामाजिक उपक्रम, सायकल फेरी, स्पर्धा, सायकल शर्यती विनामूल्यपणे आयोजित केल्या जातात.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top