Tuesday, 04 Aug, 8.42 pm प्रहार कोकण

रत्नागिरी
शिवसेनेला 'हिंदुत्वाचा विसर', किंमत मोजावी लागणार

प्रवीण दरेकर

खेड | प्रतिनिधी
शिवसेनेचे हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा 'जाज्वल्य' विचार मांडला तो सर्व सामान्यांमध्ये रुजवला त्याच मुद्दयावर अनेक निवडणूका लढवून जनमत प्राप्त केले परंतु सध्या सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे. कोकणाच्या आपती काळात दाखवलेली निष्क्रियतेची राजकीय किंमत मोजावी लागेल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खेड येथे दिला.

खेड येथे भाजपच्या तालुकाच्यावतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात प्रविण दरेकर बोलत होते. ते म्हणाले की, ८० टक्के समाजकारण करणार्या शिवसेनेची सामाजिक बांधिलकी लोप पावत असल्याचे चित्र कोविडच्या संकटात व कोकणच्या निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेची कोकणवासियांच्याप्रति निष्क्रियता दिसून येत आहे असे दरेकर म्हणाले.

शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकी या दोन गोष्टीमुळे वेगळा जनधार प्राप्त झाला होता. परंतू या दोन्ही गोष्टीचा आता शिवसेनेला सोयीस्कररित्या विसर पडल्यामुळे जनतेच्या मनात
शिवसेनेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. राम मंदिर कधी होणार असे विचारणार्यांना भूमिपूजनाची तारीख निश्चित करुन आम्ही चोख उत्तर दिले गेले आहे. कोकणात शिवसेनेला पर्याय म्हणून सामाजिक बांधिलकीची मोठ्या प्रमाणावर जाण असणार्या भारतीय जनता पार्टीचा कोकणात जनाधार वाढत आहे.कोविडच्या संकटात तसेच कोकणच्या निसर्ग वादळात भाजपने केलेले सेवाभावी कार्य हे अतुलनिय होते. तसेच हिंदूत्वाची भूमिका कोणत्याही परिणामांची पर्वा न करता ताकदीने पुढे नेण्याच काम भाजपा करीत असल्याने हिंदूत्वाच्या आधारे जनाधार वाढविणे फलदायी ठरेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी दरेकर यांच्या उपस्थितीत अनेक शिवसेनेचे कार्यकर्त्यानी प्रवेश केला. ८० टक्के समाजकारण करणार्या शिवसेनेची सामाजिक बांधिलकी लोप पावत असल्याचे चित्र कोविडच्या संकटात व कोकणच्या निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेची कोकणवासियांच्याप्रति निष्क्रियता दिसून येत आहे. असे दरेकर म्हणाले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस राजूभाई रेडीज, चिटणीस संजय बुटाला, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, मंगेश मोहिते, खेड तालुका अध्यक्ष अनिल भोसले, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी शेलार, केदार साठे आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top