Tuesday, 15 Jun, 2.40 pm प्रहार कोकण

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला कोरोना साखळी तोडण्यास अपयश

माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांचा आरोप

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यास अपयश आले आहे. आज संपुर्ण देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन लावून आज रोजी दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून मृत्यू होण्याची संख्या सुध्दा जास्त आहे, याला जबाबदार जिल्हा प्रशासन असून ते कोरोना रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी केला आहे.

एका बाजुला मुंबई सारख्या दाट लोकसंख्या असलेल्या महानगरामधील रुग्ण संख्या झपाटयाने खाली येत असुन ही शहरे अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. याउलट आपल्या जिल्ह्यातील लोकसंख्या कमी आणि लोकवस्ती विरळ आहे तरीही प्रशासनाला लॉकडाऊन, जनता कर्फ्यू लावून देखील कोरोना रोखण्यास यश येताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याचा जिल्हा प्रशासनाने गांर्भीयाने विचार करावा.

तसेच सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवुन जिल्ह्यातील जनतेला कोरोना लागण होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोरोना बाधित झालेल्याना आधुनिक औषधोपचार करुन मृत्यू दर कमी करावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. त्यासाठी आरोग्य खाते, पोलीस खाते व महसुल खाते यांची सांगड घालुन एक विचाराने योग्य ठोस निर्णय घ्यावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागामध्ये नागरीकांकडुन शासनाच्या नियमांचे पालन होत नाही तसेच लसीकरणाच्या बाबतीत लक्ष देणेकरीता जगजागृतीकडे भर दयावा.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यास आपल्याला अद्याप यश आलेले नाही. तथापि जगामधील काही देशामध्ये तिसरी लाट सुरु झालेली आहे. याबाबत मुंबई, पुण्यासारख्या महानगरामधील तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन घेणे उचीत ठरेल. पावसाळा सुरु झाला आहे. तेव्हा घोषणांचा पाऊस बंद करुन जनतेचे प्राण वाचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी मागणी गोविंद बाळा वाडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top