Dailyhunt
मालकच कंगाल बनवेल! PF चे पैसे वेळेवर जमा होतायेत का? 5 मिनिटांत मोबाईलवर बॅलेन्स तपासण्याची ट्रिक जाणून घ्या

मालकच कंगाल बनवेल! PF चे पैसे वेळेवर जमा होतायेत का? 5 मिनिटांत मोबाईलवर बॅलेन्स तपासण्याची ट्रिक जाणून घ्या

Pravah News 2 weeks ago

EPFO Balance Check Guide: नोकरी करणाऱ्यांसाठी PF हा बचतीचा सर्वात मोठा आधार असतो. पण अनेकदा आपण घाईघाईत PF बॅलेन्स चेक करण्याकडे दुर्लक्ष करतो. तंत्रज्ञानाच्या युगात आता तुम्हाला PF ऑफिसला चकरा मारण्याची गरज नाही.

तुम्ही घरी बसून केवळ 5 मिनिटांत तुमच्या मोबाईलवर बॅलेन्स तपासू शकता. तुमची फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या पद्धती आजच जाणून घ्या.

PF बॅलेन्स तपासणे का आवश्यक आहे?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा तुमच्या पगाराचा असा भाग आहे जो तुमच्या निवृत्तीनंतर कामाला येतो. नियमानुसार, तुमच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम PF म्हणून कापली जाते आणि तितकीच रक्कम मालक (Employer) जमा करतो. मात्र, अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांचा PF कापतात पण तो PF खात्यात जमा करत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्याचे व्याजाचे आणि पेन्शनचे मोठे नुकसान होते. म्हणूनच, दरमहा बॅलेन्स तपासणे गरजेचे आहे.

PF बॅलेन्स तपासण्याच्या 4 सोप्या पद्धती स्टेप-बाय-स्टेप

  • UMANG अ‍ॅपचा वापर करून तुम्ही बॅलेन्स तपासू शकतात
  • सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये 'UMANG' अ‍ॅप डाऊनलोड करा.
  • अ‍ॅप उघडून 'EPFO' सर्च करा.
  • 'Employee Centric Services' या पर्यायावर क्लिक करा.
  • 'View Passbook' वर क्लिक करून तुमचा UAN नंबर टाका.
  • तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि तुमची संपूर्ण पासबुक तुमच्यासमोर असेल.

मिस कॉल देऊन बॅलेन्स तपासा

  • तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल, तरीही तुम्ही बॅलेन्स तपासू शकता.
  • तुमच्या PF खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या.
  • कॉल आपोआप कट होईल आणि काही सेकंदात तुम्हाला SMS येईल, ज्यामध्ये तुमचा बॅलेन्स आणि शेवटचे योगदान दिसेल.

SMS द्वारे PF चे बॅलेन्स तपासा

  • तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन EPFOHO UAN MAR (मराठीत माहितीसाठी) असे टाईप करा.
  • हा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
  • काही वेळातच तुम्हाला तुमच्या खात्याची सविस्तर माहिती मराठी भाषेत मिळेल.

EPFO पोर्टलवर ऑनलाईन पासबुक कसे बघावे?

  • EPFO च्या अधिकृत पोर्टलवर (unifiedportal-mem.epfindia.gov.in) जा.
  • तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • 'Download/View Passbook' वर क्लिक करा. येथे तुम्हाला मालकाने दरमहा पैसे जमा केले आहेत की नाही, हे स्पष्टपणे दिसेल.

मालकाने पैसे जमा केले नसल्यास काय करावे?

तुमच्या पासबुकमध्ये पैसे दिसत नसतील, तर सर्वात आधी तुमच्या कंपनीच्या ह्युमन रिसोर्स (HR) विभागाशी संपर्क साधा. जर तिथे समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर तुम्ही EPF i-Grievance System (epfigms.gov.in) वर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. PF चे पैसे थकवणे हा कायदेशीर गुन्हा असून यासाठी कंपनीला दंड आणि जेल देखील होऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pravah News