Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vinayak raut case serious allegations against family by daughter in laws one accused arrested by police; विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या तक्रार प्रकरणात पोलिसांकडून पहिली अटक; कुटुंबाची डोकेदुखी वाढली

Vinayak raut case serious allegations against family by daughter in laws one accused arrested by police; विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या तक्रार प्रकरणात पोलिसांकडून पहिली अटक; कुटुंबाची डोकेदुखी वाढली

Pravah News 1 week ago

सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने कुटुंबावर गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राऊत कुटुंबाकडून माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ करण्यात आला. तसंच माझे आर्थिक खच्चीकरण करून माझ्यावर अनेक अघोरी इलाज करत माझा अमानुष छळ केला आहे, असा आरोप सुनेने कुटुंबावर केला आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून सिंधुदुर्गतील दोन आणि रत्नागिरीतील एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सावंतवाडी-कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

"माझा पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही, हे माही असूनही विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. लग्नानंतर विविध कारणे देत तो शारीरिक संबंध टाळत होता. मी याबाबत विचारलं असता त्यांनी माझ्यासोबतच भोंदूबाबांकडून अघोरी कृत्य केलं. २०१८ ते २०२४ या काळात हे कृत्य घडलं आहे," असं पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शनिवारी रात्री ठाणे पोलिसांकडून कारवाई करत फिरोज बाबा याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.कोकणात राजकारण तापलं

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सुनेनेच गंभीर आरोप केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापलं असून राऊत कुटुंबावर टीका केली जात आहे. देवगड येथील भाजप महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक छळासह बुवाबाजीचा आरोप असल्याने पीडितेला संरक्षण देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, असं भाजपच्या महिला नेत्या तन्वी चांदोस्कर यांनी म्हटलं आहे. तर 'स्वतःच्या घरातील महिलेलाच न्याय नाही, मग समाजाला काय न्याय देणार?' असा सवाल प्रियांका साळस्कर यांनी केला आहे. राऊत यांच्या सुनेने केलेल्या आरोपानंतर भाजप महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली असून या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे विनायक राऊतांचं म्हणणं?

विनायक राऊत यांनी स्वत:सह कुटुंबावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले असून सुनेवरच गंभीर आरोप केले आहेत. "माझा मुलगा गितेश राऊत आणि त्याची पत्नी मागील तीन वर्षांपासून स्वतंत्र राहत आहेत. त्यामुळे आता त्यांची घटस्फोटाची केस सुरू असून सुनेने आधी १० कोटी रुपये मदत, २ कोटी रुपये मानसिक ताणाची रक्कम, एक ३ बीएचके फ्लॅट, आलिशान कार आणि महिन्याला ५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली होती. पण या मागण्या मान्य न केल्याने तिने आमच्याविरोधात तक्रार दिली," असा दावा राऊत यांनी केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pravah News