Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चाकणला अपर तहसील कार्यालयास मंजुरी !

चाकणला अपर तहसील कार्यालयास मंजुरी !

चाकण : अविनाश दुधवडे 
  प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी चाकण अपर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. या बाबतचा शासन निर्णय झाला असून या निर्णयामुळे चाकण परिसरातील नागरिकांना राजगुरुनगर येथील तालुका मुख्यालयापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे.  प्रशासकीय सेवा देखील अधिक लोकाभिमुख होणार आहेत.
    चाकण येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापण्यास शासनाने मान्यता दिली आहे . याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी जारी करण्यात आला असून खेड तालुक्यातील 11 महसूल मंडळाचे सात व चार अशा प्रकारे विभाजन झाले असून ,  राजगुरुनगर तहसील कार्यालय मध्ये सात मंडळे तर चाकण अप्पर तहसील कार्यालयामध्ये चार मंडळे असे विभाजन करण्यात आले आहे.

 
    खेड तालुक्यातील औद्योगिक व नागरीकरण विचारात घेता नागरिकांना गतिमान प्रशासन लाभण्यासाठी तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करून विद्यमान खेड तहसील अंतर्गत खेड तालुक्यातील सुमारे १९० गावांचे विभाजन होणार आहे.  राजगुरूनगर येथे वाहतूक कोंडी,पार्किंग प्रश्न,अपघात यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता.  चाकण परिसरात औद्योगिक व नागरी क्षेत्र असून त्यांना चाकण शहर प्रशासकीय दृष्ट्या जवळ व सुलभ ठरणार आहे.  
   नवीन कार्यालयाची निर्मिती करताना सरकारने काही विशिष्ट निकष लावले आहेत. यामध्ये संबंधित क्षेत्रातील संख्या, एकूण लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, स्थानिक भागातील जनतेची गरज यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.  अतिरिक्त तहसीलदार कार्यालयासाठी महसूल मंडळांची संख्या आणि गावांमधील अंतर यावर भर देण्यात आला आहे. खासदार अमोल कोल्हे , आमदार बाबाजी काळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, असे जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ते निलेश कड यांनी सांगितले.    
------------

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PUNE LIVE pune laivh