Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वेताळे | कचरा प्रक्रिया युनिट कार्यान्वित

वेताळे | कचरा प्रक्रिया युनिट कार्यान्वित

खेड | पुणे लाईव्ह न्यूज
  वेताळे ( ता. खेड ) येथे कचरा प्रक्रिया युनिट कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती  ग्रामपंचायत सदस्या कविता बोंबले यांनी दिली आहे.  

चासकमान धरण परीसरातील आदर्श गाव वेताळे  येथे ई .अँड पी. युनिटी फार्म च्या वतीने  गावात स्वच्छता राखण्यासाठी आणि महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  दोन ई अँड पी कचरा प्रक्रिया युनिट कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ती आणि ग्रामपंचायत सदस्या कविता बोंबले यांनी दिली.


        वेताळे गावातील महिला बचतगटांसाठी देण्यात आलेल्या टाक्यामधुन ओल्या कच-या पासून कंपोस्ट खत निर्मिती प्रक्रीया प्रकल्प
ग्रामपंचातीच्या सरपंच सविता बोंबले आणि सदस्य मंडळीच्या देखरेखी खाली सावित्री महिला बचत गट, मुक्ताता देवी महिला बचत गटासह सात बचतगटातील  १३७ महिलांच्या सहभागातुन उत्पन्न वाढणार आहे. यामुळे गावासह परीसरातील ६ वाड्यावस्त्या कचरा मुक्त होणार आहे.
हा घनकचरा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी चैतन्य फाऊंडेशन, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता तज्ञ विक्रम शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली काम सुरु करण्यात आले आहे.
       ग्रामपंचायत  ई अँड पी युनिट स्थापन करण्यात येऊन बचत गटाच्या माध्यमातून ग्रामस्थांना ओला व सुखा कचरा या संदर्भात मार्गदर्शन करून तयार होणारे खत  शेतकऱ्यांना कमीतकमी किंमत विकून शेतकऱ्यांना त्याचे अधिक उत्पन्न वाढी बरोबरच जमीनाच पोत सुधारणा होण्याबरोबर सेंद्रिय पीक उत्पादन घेण्यास मदत होणार आहे.
       यावेळी ग्रामपंचायत सदस्या कविता बोंबले, रेखा राव, शुभांगी बोंबले,  संध्याताई सांडभोर, स्वाती जाधव, मनिषा बोंबले, नंदाबाई सिलकर, मंदाकिनी बोंबले, वैशाली वाळुंज, शारदा बोंबले, आयशा शेख,  मुन्सीफ शेख, आदी सह महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
---------
--------
PUNE LIVE NEWS | MARATHI
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
संपर्क | ७०२०३७३०९१

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PUNE LIVE pune laivh