Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

ग्रा : प्रेमविवाहाचा निर्णय घेतल्यामुळे एका तरुणीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे समोर आली आहे. समाजातील प्रतिष्ठा आणि मान-सन्मानाच्या चुकीच्या कल्पनेतून एका वडिलांनी स्वतःच्या 24 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे.

चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर मुलीने कोर्ट मॅरेज केल्याचे समजल्यानंतर वडिलांनी संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

ही घटना जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रताप नगर परिसरात घडली. 3 ऑगस्ट 2026 रोजी रात्री विमल शर्मा (वय 55) यांच्या घरातून मध्यरात्री अचानक जोरदार वादाचा आवाज आणि एका तरुणीच्या किंचाळण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला. काही वेळातच घरातील दिवे बंद झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता अंकिता शर्मा ही घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांच्या तपासानुसार, अंकिता ही उच्चशिक्षित होती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. गेल्या 4 वर्षांपासून तिचे अमित पचौरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अमित हा इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कार्यरत आहे. कुटुंबाचा या नात्याला विरोध असल्याने अंकिता आणि अमित यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये गुपचूप कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, लग्नाची माहिती नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये पसरल्यानंतर घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून वडिलांनी संतापाच्या भरात ओढणीच्या मदतीने अंकिताचा गळा आवळून तिची हत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वडील विमल शर्मा यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News