Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आजचा दिवस आव्हानांचा! 'या' राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

आजचा दिवस आव्हानांचा! 'या' राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

पुणे : वैदिक पंचांगानुसार, आज 5 जुलै 2026 रोजी रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज बनत असलेल्या दुर्मिळ योगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे.

सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, ते जाणून घेऊया..

आजचे राशिभविष्य (Horoscope Today)

सिंह (Leo): आज तुमच्या मनात विचार काही वेगळे असतील आणि प्रत्यक्षात कृती मात्र भलतीच घडेल. या विसंगतीमुळे मनाची द्विधा अवस्था होऊ शकते.

मेष (Aries): आजचा दिवस मानसिक तणावाचा राहू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीच्या व्यवहारात फसवणूक होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.

तूळ (Libra): तुमच्या मनासारख्या घटना घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. जोडीदाराकडून तुम्हाला उत्तम साथ आणि प्रेम लाभेल.

वृषभ (Taurus): राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तींना आपली बाजू जनतेमध्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी आज नवीन मार्ग किंवा क्लृप्त्या शोधाव्या लागतील.

धनु (Sagittarius): तुमचे नवीन विचार आणि कल्पना लोकांसमोर मांडण्यात तुम्हाला आज मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini): आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आज आजारपण उद्भवण्याची शक्यता आहे. महिलांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत.

मकर (Capricorn): आज तुमचा स्वभाव इतरांशी थोडा फटकून वागण्याचा राहील. कामाच्या वेळी काम आणि विश्रांतीच्या वेळी विश्रांती हे सूत्र पाळणे हिताचे ठरेल.

कर्क (Cancer): आज तुमच्या भावना, इच्छा आणि कर्तव्य या गोष्टींमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू राहील. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius): सरकारी किंवा प्रशासकीय कामांमध्ये आज अडथळे येण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत गाफील राहू नका.

कन्या (Virgo): तुमच्या वागण्यामुळे जवळच्या लोकांच्या मनात थोडी भीती निर्माण होऊ शकते. मात्र, तुम्ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणाल.

मीन (Pisces): वाढत्या मानसिक ताणामुळे रक्तदाबाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सत्ता किंवा स्पर्धेच्या ठिकाणी सावध राहूनच पावले टाका.

वृश्चिक (Scorpio): व्यवसाय क्षेत्रात कोणताही मोठा किंवा धाडसी निर्णय विचार केल्याशिवाय घेऊ नका. यंत्रसामग्रीवर काम करताना विशेष काळजी घ्यावी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News