Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

पुणे : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांचे नेतृत्व करणारे 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांची आज अचानक प्रकृती खालावल्याची घटना घडली. सकाळी 11.45 च्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाच्या पार्किंगमध्ये समर्थकांशी संवाद साधत होते.

त्यावेळी त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि त्रास जाणवू लागला. त्रास वाढल्यामुळे ते संवाद अर्धवट सोडून घरात निघून गेले, जिथे त्यांना उलट्या आणि लूज मोशनचाही त्रास सुरू झाला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयव्ही फ्लूइड दिले असून संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीत सध्या चांगली सुधारणा होत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता खूप कमी आहे. यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान त्यांना टायफॉइडची लागण झाली होती. दिल्लीत त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, तर नंतर ती निगेटिव्ह दाखवण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि विश्रांतीनंतर आराम न वाटल्यास पुन्हा एकदा त्यांची रक्ततपासणी केली जाणार आहे.

अभिजीत दिपके यांनी स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टीला’ सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET मधील कथित पेपर फुटीच्या विरोधात या पक्षाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यासाठी सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन केले होते, तसेच संसदेवर मोर्चाही काढला होता. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News