Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अखेर जाग आलीच! विषारी दारूने बळी घेतल्यावर शिरूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; दारूच्या भट्ट्यांवर चालवला जेसीबी

अखेर जाग आलीच! विषारी दारूने बळी घेतल्यावर शिरूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; दारूच्या भट्ट्यांवर चालवला जेसीबी

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील शेळके वस्ती परिसरात गावठी हातभट्टीद्वारे अवैध दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत तयार गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन आणि वाहनासह तब्बल १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी निलेश गुलाब लोंढे वय ३४, रा. निमगाव भोगी, शेवाळे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली असुन त्याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला २९ मे रोजी अटक करण्यात आली असून, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांनी त्याला ३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास निमगाव भोगी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती येथे छापा टाकण्यात आला यावेळी आरोपी हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन रापवून तयार दारू साठवून ठेवताना आढळून आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ५०० लिटर कच्चे रसायन, २०० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, तसेच एमएच 12 पी एन 3634 क्रमांकाची अल्टो कार असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन व साहित्य दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले आहे.

तपासात आरोपीविरोधात यापूर्वीही महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News