Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!मध्यरात्री 2 नेत्यांना बेड्या, राजकीय वर्तुळात खळबळ

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!मध्यरात्री 2 नेत्यांना बेड्या, राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : पुण्यातील एका महाविद्यालयात झालेल्या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 मनसैनिकांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात तत्परतेने पावले उचलत पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली असून प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन प्रमुख मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या अचानक झालेल्या अटकेमुळे मनसे सैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी अमित ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असताना विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि कॅन्टीनमधील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या भेटायला गेले होते. प्राचार्यांच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र लावले होते. शिवरायांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो लावण्यावर अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या केबिनमधील पंतप्रधान मोदींचा फोटो तिथून हटवला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनसे कार्यकर्त्यांनी विनापरवानगी आवारात प्रवेश करून घोषणाबाजी केली. तसेच प्राचार्यांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना धमकावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

सध्या अमित ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही, मात्र पोलीस त्यांना चौकशीची नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. प्राथमिक चौकशीनंतरच पोलीस पुढील कायदेशीर पावले उचलतील. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News