Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

मुंबई : बदलापूरमध्ये आयोजित एका दहीहंडी उत्सवाच्या सरावा दरम्यान एक थरारक आणि दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या वतीने 'माखन चोर दहीकाला उत्सव' आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रज्वल प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकाने सात थर रचून सलामी देण्याचा प्रयत्न केला. सातव्या थरावर पोहोचलेल्या एका लहान गोविंदाने सलामी दिल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या, पण त्याच क्षणी सेफ्टी बेल्ट अचानक तुटला आणि तो चिमुकला सरळ वरून खाली कोसळला.

हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दहीहंडीचा सण तोंडावर आल्याने सध्या सर्वत्र गोविंदा पथकांची जोरदार तयारी आणि सराव सुरू आहे. सुरक्षेचे उपाय योजलेले असतानाही ऐनवेळी बेल्ट तुटल्यामुळे सुरक्षेच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या आणि इतर गोविंदांच्या अंगाचा थरकाप उडाला. काही वेळासाठी तेथे भीतीचे वातावरण आणि मोठी खळबळ निर्माण झाली होती. सुदैवाने खाली उपस्थित असलेल्या इतर सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर गोविंदांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी आता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News