Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या वाहनांना अखेर 'घरचा रस्ता' ; धूळ खात पडलेली 13 वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन, 5 लाखांचा मुद्देमाल परत, आणखी 50 वाहनांचा शोध सुरू..

बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या वाहनांना अखेर 'घरचा रस्ता' ; धूळ खात पडलेली 13 वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन, 5 लाखांचा मुद्देमाल परत, आणखी 50 वाहनांचा शोध सुरू..

बारामती, (पुणे) : पोलीस ठाण्याच्या आवारात गुन्ह्यातील किंवा बेवारस अवस्थेत वर्षानुवर्षे उन्हापावसात धूळ खात पडून असलेल्या वाहनांना अखेर न्याय मिळाला आहे. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनने एक विशेष मोहीम राबवून तब्बल 13 बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेत ती त्यांच्या स्वाधीन केली आहेत.

अशी माहिती बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पोलिसांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे अनेक वर्षांपासून आपल्या वाहनांची आशा सोडून बसलेल्या मालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले असून, ‘खाकी’प्रती नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरात शेकडो वाहने पडून राहिल्याने जागेची मोठी अडचण निर्माण होते आणि शासनाचा हा मुद्देमाल भंगार बनतो. हीच समस्या ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने मोहीम हाती घेतली.

अनेक वाहनांची अवस्था अतिशय दुरवस्थेत होती, तर काहींचे नंबर प्लेटही गायब होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी अत्यंत चिकाटीने वाहनांचे इंजिन नंबर आणि चेसिस नंबर गोळा केले. त्यानंतर आरटीओ (RTO) नोंदी, जुने गुन्हे रेकॉर्ड आणि कागदपत्रांची कसून पडताळणी करत थेट मालकांचे पत्ते शोधून काढले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 5 लाख 20 हजार रुपये किमतीची 13 वाहने त्यांच्या ताब्यात दिली.

बाळासाहेब आल्हाट (रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) | MH-42 X-1912, किशोर दळवी (रा. दहिगाव, ता. माळशिरस) | MH-45 Z-2285, विशाल निंबाळकर (रा. फरतडवाडी, ता. फलटण) MH-11 BF-8469, शरद भगवान गरुड (रा. वाल्हे, ता. पुरंदर) | MH-12 GJ-2373, किरण सतीश जराड (रा. माळेगाव बुद्रुक शिवनगर, ता. बारामती) | MH-42 AK-3270, रामदास धोंडीबा चव्हाण (रा. काळेवाडी, ता. दौंड) | MH-42 R-2079, कुंडलिक जयसिंग घोरपडे (रा. कोळविहिरे, ता. पुरंदर) | MH-12 GY-2034, अमर आजिनाथ भोसले (रा. झारगडवाडी, ता. बारामती) | MH-42 AL-5526, सुनील दत्तात्रय कोकणे (रा. झारगडवाडी, ता. बारामती) | MH-42 AL-4162, सदाशिव विश्वनाथ कोठाळे (रा. गोखळी, ता. फलटण), MH-11 CR-3374, अण्णा उत्तम चव्हाण (रा. कोपर्डी हवेली, ता. कराड) | MH-50 E-7379, राजेंद्र वसंत आटोळे (रा. गोखळी, ता. फलटण) | MH-42 AC-3771, नंदकुमार कोंडीबा लोंढे (रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती) | MH-42 U-6205 अशी वाहन मालकांची नावे आहेत.

याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले,“पोलीस ठाण्याच्या आवारातील 13 वाहने आम्ही मूळ मालकांना मिळवून दिली आहेत. ही केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांत आणखी 50 बेवारस वाहनांचा तांत्रिक शोध घेऊन तीही त्यांच्या खऱ्या मालकांच्या स्वाधीन करण्यासाठी आमची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, हवालदार कल्याण शिंगाडे, भारती खंडागळे, नितीन ढवन आणि निलेश वाकळे यांच्या पथकाने केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News