Dailyhunt
Bhor News  : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस-इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस-इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

म्रान आत्तारBhor News भोर, ता. 5 : भोर रामबाग मार्गावर आज मंगळवारी (दि. 5) सकाळी भीषण अपघात घडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. एसटी बस आणि इको गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेमुळे हा अपघात झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhor News

मिळालेल्या माहितीनुसार, भोर एसटी डेपोकडे येणारी एसटी बस (एमएच 06 एस 8294, भोर-दुर्गाडी-भोर) आणि डेपोकडून रामबागकडे जाणारी इको गाडी (एमएच 05 सीएम 5752) यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की इको गाडीचा चेंदामेंदा झाला आणि त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. Bhor News

या अपघातात इको गाडीतील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. Bhor News

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग आणि निष्काळजीपणा कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे भोर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. Bhor News

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News