Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भोर शहरातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी; भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस प्रशासनाला निवेदन

भोर शहरातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी; भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस प्रशासनाला निवेदन

इम्रान अत्तार

भोर: भोर शहरामध्ये वाढत चाललेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. शहरातील अवैध व्यवसाय, बेकायदेशीर धंदे तसेच समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात आज भोर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू धंदे, मटका, जुगार अड्डे अशा धंद्यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच युवकांवर होणारे दुष्परिणाम, सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आणि कायदा सुव्यवस्थेवर होणारा परिणाम याकडेही पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद (नाना) आवारे, नगरसेवक केदार देशपांडे, नगरसेवक कुणाल धुमाळ, सोमनाथ ढवळे, संदिप(बाबू )शेटे, अतुल काकडे, सागर वालगुडे, सोनल साळुंखे, सोमेश घोणे, बाळा शेटे, मनीष धुमाळ, मयूर भिसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन शहरातील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News