Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लोणी काळभोर, ता.29 : शेतजमीन सपाटीकरण, विहीर खोदकाम व पाईपलाईनची परवानगी देण्यासाठी 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर लाचेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय शिवाजी कोल्हे (वय 28 पद-ग्राम महसूल अधिकारी नेमणूक अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी हिंगणगाव ता. हवेली येथील शेतजमीन सपाटीकरण, विहीर खोदकाम व पाईपलाईनची परवानगी मिळावी. याकरीता अप्पर तहसीलदार लोणी काळभोर यांच्याकडे अर्ज केला होता. लोकसेवक आरोपी अक्षय कोल्हे यांनी
या कामाची परवानगी देण्यासाठी तक्रारदाराकडे 2 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी दरम्यान, आरोपी लोकसेवक अक्षय शिवाजी कोल्हे यांनी 2 लाखांची लाच मागून तडजोडीअंती 1 लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविण्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार कोल्हे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News