Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी 'रासायनिक ताडी'चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी 'रासायनिक ताडी'चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Chemical toddy : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूकांडामुळे मृतांचा आकडा वाढत असतानाच लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत मानवी आरोग्यास घातक ठरणारी रासायनिक ताडी तयार करणाऱ्या आई-मुलाला रंगेहाथ पकडले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यातून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी घटनास्थळावरून तयार ताडी, घातक स्फटिक पदार्थ आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. Chemical toddy

सिद्धांत सुरेश भाले (वय २२) आणि मुक्ताबाई सुरेश भाले (वय ५१, रा. गारुडी वस्ती, शितळादेवी नगर, लोणी काळभोर) अशी अटक करण्यात आलेल्या मायलेकांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार कविता संपत साळवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गारुडी वस्ती येथे एका पत्र्याच्या घरात रासायनिक पदार्थ मिसळून ताडी तयार करून तिची विक्री केली जात आहे. Chemical toddy

या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला. शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता कारवाई करण्यात आली असता एक पुरुष आणि एक महिला निळ्या रंगाच्या टबमध्ये पिवळसर स्फटिक पदार्थ मिसळून ताडी तयार करताना आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेला पिवळसर-पांढरा स्फटिक पदार्थ हा एका रमेश नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे आरोपींनी सांगितले. तसेच ४० लिटर पाण्यात या स्फटिकाची एक पुडी मिसळल्यानंतर ४० लिटर ताडी तयार होत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी पोलिसांना दिली. Chemical toddy

घटनास्थळी असलेल्या द्रव पदार्थाची आणि स्फटिकांची पाहणी केली असता त्यातून अत्यंत उग्र व आंबट वास येत होता. त्यामुळे हा पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी १६ लिटर तयार ताडी, ५ पिशव्यांमध्ये भरलेला घातक स्फटिक पदार्थ, दोन मोबाईल फोन, असा सुमारे १२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ताडी आणि स्फटिक पदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित ताडी आणि रसायन जागीच नष्ट करण्यात आले. ताडी तयार करण्यासाठी वापरलेले टब आणि साहित्यही फोडून नष्ट करण्यात आले. Chemical toddy

याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 3(5) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65(ई), 65(ड) आणि 86 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशाच प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरून दारू तयार केली जात होती का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत. Chemical toddy

html body *:not(input):not(textarea)selection, body *:not(input):not(textarea)selection, html body div *:not(input):not(textarea)selection, html body span *:not(input):not(textarea)selection, html body p *:not(input):not(textarea)selection, html body h1 *:not(input):not(textarea)selection, html body h2 *:not(input):not(textarea)selection, html body h3 *:not(input):not(textarea)selection, html body h4 *:not(input):not(textarea)selection, html body h5 *:not(input):not(textarea)selection { background-color: #3297fd !important; color: #ffffff !important; }

/* linkedin */ /* squize */ .www_linkedin_com .sa-assessment-flow__card.sa-assessment-quiz .sa-assessment-quiz__scroll-content .sa-assessment-quiz__response .sa-question-multichoice__item.sa-question-basic-multichoice__item .sa-question-multichoice__input.sa-question-basic-multichoice__input.ember-checkbox.ember-view { width: 40px; } /*linkedin*/

/*instagram*/ /*wall*/ .www_instagram_com ._aagw { display: none; }

/*developer.box.com*/ .bp-doc .pdfViewer .page:not(.bp-is-invisible):before

/*telegram*/ .web_telegram_org .emoji-animation-container { display: none; } html body.web_telegram_org .bubbles-group > .bubbles-group-avatar-container:not(input):not(textarea):not( ):not(), html body.web_telegram_org .custom-emoji-renderer:not(input):not(textarea):not():not( ) { pointer-events: none !important; }

/*ladno_ru*/ .ladno_ru { display: none !important; }

/*mycomfyshoes.fr */ .mycomfyshoes_fr #fader.fade-out { display: none !important; }

/*www_mindmeister_com*/ .www_mindmeister_com .kr-view { z-index: -1 !important; }

/*www_newvision_co_ug*/ .www_newvision_co_ug .v-snack:not(.v-snack--absolute) { z-index: -1 !important; }

/*derstarih_com*/ .derstarih_com .bs-sks { z-index: -1; }

html body .alc_unlock-pseudo-before.alc_unlock-pseudo-before.alc_unlock-pseudo-beforebefore { pointer-events: none !important; } html body .alc_unlock-pseudo-after.alc_unlock-pseudo-after.alc_unlock-pseudo-afterafter { pointer-events: none !important; }

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News