Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

पिंपरी-चिंचवड : दहीहंडी आणि त्यानंतर होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उत्सवांचे वातावरण रंगू लागले आहे. शहरातील विविध भागांत दहीहंडीचे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांना कलाकार, अभिनेत्री, अभिनेते तसेच काही प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. अनेक मंडळांकडून मनोरंजनासाठी कलाकारांचे कार्यक्रमही ठेवले जातात. मात्र, कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील नृत्य किंवा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास ते अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. अशा प्रकारामुळे गर्दी वाढून गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पोलिसांच्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवाच्या काळात शहरातील विविध कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जाणार आहे. एखाद्या कार्यक्रमाबाबत तक्रार मिळाल्यास पोलिसांकडून त्याची तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे मंडळांनी कार्यक्रम आयोजित करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी गणेशोत्सवासाठीही पोलिसांनी मंडळांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सवमध्ये उत्सवाचा आनंद घेताना कायदा-सुव्यवस्था आणि इतर नागरिकांना होणारा त्रास याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयोजकांनी आक्षेपार्ह कार्यक्रम टाळून शांततेत आणि सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News