Daund Sex Racket : दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हाय-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांसह एकूण 6 महिलांची यातून सुटका करण्यात आली आहे.
कुरकुंभ रोड लगत असलेल्या बोरावकेनगर (गोपाळवाडी) परिसरात दौंडचे ज्येष्ठ नेते नंदू पवार यांच्या मालकीच्या असणाऱ्या 'रिलॅक्स इन लॉजिंग'वर स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. Daund Sex Racket
याप्रकरणी लॉज चालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज अनिल पवार (वय ३५ वर्षे, रा. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Daund Sex Racket
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रिलॅक्स इन लॉजिंग' या ठिकाणी पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची टीप पुणे ग्रामीण एलसीबीला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी शनिवारी दुपारी पोलिसांनी एक ‘बनावट ग्राहक’ त्या ठिकाणी पाठवला. लॉजवर गेलेल्या बनावट ग्राहकासोबत तिथल्या महिलांनी पैशांच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची तयारी दर्शवताच, तिथे काळा धंदा सुरू असल्याचे रंगेहात निष्पन्न झाले. Daund Sex Racket
बनावट ग्राहकाचा इशारा मिळताच सायंकाळी पच वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांच्या पथकाने लॉजला वेढा घालून आत छापा टाकला. यावेळी लॉजमधील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 6 पीडित महिला आढळून आल्या. तसेच बनावट ग्राहकाला पडताळणीसाठी दिलेल्या 500 रुपयांच्या 2 चिन्हांकित नोटा, 50 रुपये किमतीची 3 कंडोम पाकिटे, 2 बांगलादेशी महिला व 1 पश्चिम बंगाल राज्यातील व 3 महिला महाराष्ट्र राज्यातील असल्याचे निदर्शनास आले. Daund Sex Racket
दरम्यान, या सर्व महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि जबरदस्तीने या दलदलीत ढकलले गेले होते. सध्या या महिलांची सुटका करून त्यांना पुढील आवश्यक ती मदत, वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी महिला सुधारगृहात पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. मनोज पवार याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कडक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Daund Sex Racket

