Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

पुणे: गणेशोत्सवातील DJ आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोड परिसरातील कशाळे चौकात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांशी संवाद साधत असताना काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बापट हे गणेशोत्सवात मोठ्या आवाजात DJ आणि लाऊडस्पीकरचा वापर करण्याला विरोध करत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी मोठ्या आवाजाच्या DJवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावरून त्यांचा काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला होता. परिस्थिती वाढल्यानंतर पोलिसांनी त्यांना बैठकीतून बाहेर नेले होते.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्या DJविरोधी भूमिकेवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, तर काहींकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, पारंपरिक वाद्यांना त्यांचा विरोध नसून अनावश्यक ध्वनीप्रदूषणाला त्यांचा आक्षेप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कशाळे चौकातील मारहाणीच्या प्रकरणात संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News