Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

राहुलकुमार अवचट

वत: यवत पोलिस स्टेशन हद्दीतील खुटबाव गावच्या हद्दीत दि.३१/०७/२०२० रोजी आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार उर्फ मंगेश अरुण जाधव (रा. सद्गुरू कॉलनी, वेणू नगर, वाकड रोड, ता.

हवेली, जि. पुणे ) याने पत्नी मनिषा उर्फ हनिबाई उर्फ आशीबाई मंगेश जाधव व दिपक वाघमारे (रा. भोर, जि. पुणे) यांच्यावर लोखंडी कोयता व लाकडी काठीने जीवघेणा हल्ला करून दोघांची निघृण खून केला होता.

याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील यांनी आरोपीविरुद्ध भक्कम व सबळ पुरावे संकलित करत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आज दि. ०२/०७/२०२६ रोजी सदर खटल्याची सुनावणी अपर व जिल्हा सत्र न्यायालय, बारामती येथे झाली असून न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब व सरकार पक्षाने सादर केलेल्या युक्तिवादाचा विचार करून आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार उर्फ मंगेश अरुण जाधव यास दोषी ठरवून आरोपीस जन्मठेप व रु. ५,०००/- दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. यावेळी सरकारी अभियोक्ता सुनील वसेकर यांनी युक्तिवाद केला.

सदर खटल्यात यवत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, केस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर माने, जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सोळसकर, न्यायालय पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरख कसपटे, सहाय्यक फौजदार ए. जे. कवडे, पोलीस हवालदार अतुल राऊत,अनिल माने, इंद्रजीत वाळुंज, धनराज कुंभार, वेणुनाद टी. ढोपरे यांनी सदर खटल्याचे कामकाज पाहिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News