Dailyhunt
Fursungi Murder News : फुरसुंगी खून प्रकरणाचा ५ तासांत उलगडा! खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ मुख्य आरोपी जेरबंद

Fursungi Murder News : फुरसुंगी खून प्रकरणाचा ५ तासांत उलगडा! खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ मुख्य आरोपी जेरबंद

Fursungi Murder News : फुरसुंगी, (पुणे) : फुरसुंगी येथे कुख्यात रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २५) याच्यावर सहा जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत निर्घृण हत्या २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केली होती.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. Fursungi Murder News

परंतु, पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता दाखवत फुरसुंगीतील गाजलेल्या खून प्रकरणाचा अवघ्या पाच तासांत उलगडा केला आहे. खंडणी विरोधी पथक ०२ च्या धडाकेबाज कारवाईत तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. Fursungi Murder News

ओंकार उर्फ ओम प्रमोद मोरे (वय २३), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २०) आणि अरुण अनिल यादव (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मस्तानी तलाव परिसरात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी चपळाईने पाठलाग करत त्यांना पकडले. प्राथमिक चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अरुण यादव हा आधीच तडीपार असतानाही शहरात येऊन या गुन्ह्यात सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. Fursungi Murder News

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, हल्ला आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, न्यायालयीन कोठडीसाठी त्यांना हजर करण्यात येणार आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. या वेगवान कारवाईमुळे पुणे पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेशही यामधून देण्यात आला आहे. Fursungi Murder News

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ,सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे, पोलिस अंमलदार पवन भोसले यांच्या पथकाने केली आहे. Fursungi Murder News

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News