Dailyhunt
हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Gaurav More wedding : पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदी शो 'महाराष्ट्राची हास्ययात्रा'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

गौरवने नुकतेच गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली असून त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियांका कारेकरसोबत त्याने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरवच्या लग्नाचे काही खास फोटो अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोसोबत तिने नवदांपत्याला शुभेच्छा देत त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गौरवच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी आनंदाचा धक्का ठरली आहे. विशेष म्हणजे त्याने लग्नासोबतच नवीन घरही घेतले आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोमधून त्याच्या नव्या घराची झलकही दिसून येत आहे. घराबाहेर लावलेली 'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी नेमप्लेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या या हटके स्टाईलमुळे चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

दरम्यान, गौरव आणि प्रियांका काही काळापासून एकमेकांना ओळखत असल्याची चर्चा होती. प्रियांकाने याआधी त्याच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत त्याला विशेष व्यक्ती म्हटले होते. आता या दोघांनी लग्न करत आपल्या नात्याला अधिकृत रूप दिले आहे.

गौरव मोरेने विविध विनोदी कार्यक्रमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयामुळे आणि कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांनी त्याला नेहमीच पसंती दिली आहे. आता तो आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असून त्याच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News