पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.. मात्र, आज सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.भारतीय बाजारात आज सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरण झाली असून, ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
24कॅरेट शुद्ध सोन्यापासून ते दागिन्यांसाठी प्राधान्याने वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेऊया .
आजचे प्रमुख शहरातील सोन्याचे भाव (प्रति 10 ग्रॅम / 1 तोळा):
मुंबई आणि पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत:
24 कॅरेट सोने: ₹1,44,000 (प्रति ग्रॅम ₹14,400, तर कालच्या तुलनेत ₹220 ची घसरण)
22 कॅरेट सोने: ₹1,32,000 (प्रति ग्रॅम ₹13,200, तर कालच्या तुलनेत ₹200 ची घसरण)
18 कॅरेट सोने: ₹1,08,000 (प्रति ग्रॅम ₹10,800, तर कालच्या तुलनेत ₹160 ची घसरण)
सोन्याचे भाव एकाच पातळीवर स्थिर न राहता त्यात सातत्याने बदल होत असतात. यामागे देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवरील विविध आर्थिक आणि राजकीय घडामोडी कारणीभूत असतात. आज झालेल्या दरकपातीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, भारतीय रुपयाचे मूल्य आणि व्यापाऱ्यांनी केलेली नफा वसुली ही प्रमुख कारणे आहेत.

