Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाडक्या बहिणींना थेट ₹3000 ची रक्षाबंधन भेट? सरकारची तातडीची अपडेट; खात्यात पैसे कधी जमा होणार?

लाडक्या बहिणींना थेट ₹3000 ची रक्षाबंधन भेट? सरकारची तातडीची अपडेट; खात्यात पैसे कधी जमा होणार?

पुणे : महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत आधारवड ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते.

आता ऑगस्ट महिना सुरू झाल्याने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची मिळून 3000 रुपयांची रक्कम खात्यात एकत्र जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारने रक्षाबंधनाचे औचित्य साधून यापूर्वी दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे दिला होता. त्यावेळी लाखो महिलांच्या बँक खात्यात 1500 ऐवजी 3000 रुपये जमा झाले होते. यंदाही ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन येत असल्याने दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्र द्यावी, अशी मागणी केली जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा निधी एकत्रित देण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा तातडीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

मात्र जुलै महिन्याचा रखडलेला हप्ता 15 ऑगस्टपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पैसे नक्की कधी जमा होणार आणि एकाच वेळी 3000 रुपये मिळणार की नाही, यावर लवकरच स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.

सरकारकडून महिलांना दरमहा मिळणाऱ्या या रकमेचा वापर महिला आपल्या दैनंदिन गरजा आणि इतर कामांसाठी करतात. आता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News