Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची बदली

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची बदली

लोणी काळभोर, ता. 2 : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आले आहेत.

तर लोणी काळभोरच्या पोलीस निरीक्षकपदी (गुन्हे) प्रदीप नागनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (ता.2) रात्री उशिरा दिली आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ मधील तरतुदीप्रमाणे पोलीस आस्थापना मंडळ, शहर यांची बैठक मंगळवारी संपन्न झाली. पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती पदस्थापना करण्यात आली आहे. तसेच पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे तात्पुरते पदस्थापनेचे ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार करावा व अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News